Pune | Thu, 09 October 2025

Ad

आळंदी रोडवरील विश्रांतवाडीत 'अपघाती चौक'-प्रशासनाचे व वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

Sunil Goyal | 124 views
आळंदी रोडवरील विश्रांतवाडीत 'अपघाती चौक'-प्रशासनाचे व वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

येरवडा, दि. २3 (प्रतिनिधी)-मनोज अगरवाल

 

येरवडा (मनोज अगरवाल) - आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडी चौकात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटर व उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी (दि.22)दुपारी एकाच्या सुमारास चारचाकी वाहनाची दुभाजकाला जोरदार धडक वसुन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या चौकात रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालक वाहतूक नियमांची पायमल्ली करीत आहेत. वाहने भरधाव वेगाने जातात तसेच चौकात बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. पथारीवाल्यांच्या व हारफुलांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीच अरुंद झाला आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत.

उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे या रस्त्याच्या कडेला लोखंडी दुभाजक हटविण्यात आले आहेत, त्याऐवजी ठेवलेले प्लस्टिकचे दुभाजक अपुरे पडत आहेत. 

उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली 

या चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आलेले असले तरी वाहनचालक त्यांना जुमानत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वांत गंभीर बाब म्हणजे अशा संवेदनशील चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थिती अत्यंत दुर्मिळ असते.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांची बेशिस्त वृत्ती यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

उड्डणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या चौकात आत्तापर्यंत झालेल्या अपघातांची मालिका

2025 मधील काही झालेली अपघात 

27 मे 2025 : एका दुचाकीवरील युवक या चौकावरून जात असताना पीसीएमसीचा कचर्‍याच्या ट्रकला धडकून जागीच ठार झाला. तात्काळ ठाण्यात चालकाला अटक करण्यात आली

18 जून 2025: आळंदी रस्त्यावरून जात असतान एका पादचार्‍याला भरधाव वाहनाची धडक लागून त्याला मृत्यू झाला.

1 जुलै 2025: विश्रांतवाडी भागात तीन मृत्यू झालेल्या वेगवेगळ्या अपघातांपैकी एक आळंदी रस्त्यावर-पादचार्‍याचा मृत्यूही या चौकाजवळ झाला

अलीकडीलच : केवळ 3 दिवसांपूर्वी, एका कारने दुचाकीस्वाराला धडक दिली; या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे.

स्थानिकांची मागणी:

येथे सिग्नल लावण्यात यावा

गतिरोधक बसवावेत

झेब्रा क्रॉसिंग व सूचना फलक निदर्शनी ठिकाणी लावाले 

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp