ndia vs England Manchester Test: इंग्लंड आणि भारतमधील चौथा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. भारतीय खेळाडूंनी चिकाटीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. एक टप्पा तर असा आला होता की, इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय फलंदाज रवींद्र जडेजाला हस्तांदोलन करत सामना घोषित करण्याची ऑफर दिली. मात्र त्याने ही ऑफर दिली तेव्हा रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आपल्या शतकाच्या जवळ होते. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. शतकांच्या जवळ असल्याने जडेजा आणि वॉशिंग्टनने ही ऑफर नाकारली. यानंतर बेन स्टोक्सने जाणुनबुजून पार्ट टाइम गोलंदाजही नसणाऱ्या हॅरी ब्रूककडे चेंडू सोपवला.
Python Programming, Android App Dev, AI, Machine Learning, Cloud Computing, Data Mining
जडेजा आणि वॉशिंग्टनने शतक ठोकल्यानंतर बेन स्टोक्सने मैदानात त्यांचं अभिनंदन करण्यास नकार दिला. मात्र त्याने पत्रकार परिषदेत अखेर त्यांची स्तुती केली. "दोघांनी केलेली खेळी खूपच जबरदस्त होती," असं त्याने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं.
"भारत ज्या परिस्थितीत होता, आम्ही खेळाची सुरुवात जशी केली होती, ते पाहता भागीदारी खूप मोठी होती. तुमच्याकडे सामन्यात वर्चस्व होतं. ते अविश्वसनीय आणि जबरदस्त चांगले खेळले. मला वाटत नाही की नाबाद शतक ठोकून तुमच्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात, 80, 90 धावांवर नाबाद राहण्यापेक्षा जास्त समाधान मिळालं असतं. तुम्ही तुमच्या संघासाठी तेच केलं आहे. आणखी 10 धावा किंवा जे काही होते ते तुम्ही तुमच्या संघाला खूप कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आहात आणि शेवटच्या सामन्यापूर्वी तुमच्या संघाला मालिका पराभवापासून जवळजवळ वाचवले आहे हे तथ्य बदलणार नाही," असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे.
दरम्यान बेन स्टोक्सला टीकेचा सामना करावा लागत आहे. बेन स्टोक्सला या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने पाठराखण केली. माझ्या मुख्य गोलंदाजांनी गोलंदाजी करायला लावून जोखीम वाढवण्याची इच्छा नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे.
AI Training - AI Tools for Everyone
"मला वाटतं की आम्ही आमच्या आघाडीच्या गोलंदाजांसह शक्य होईल तितका सामना पुढे नेला. जिथे जिथे आम्हाला सामना जिंकण्याची संधी आहे असं वाटत होतं, तिथपर्यंत त्यांनी गोलंदाजी केली. पण जेव्हा परिस्थिती अशी आली की येथे सामना अनिर्णित होणं अपरिहार्यता होती, तेव्हा मला गोलंदाजांप्रती जोखीम घेण्याची इच्छा नव्हती. संपूर्ण आठवडाभर आलेला वर्कलोड मला गोलंदाजांवर टाकत धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे शेवटच्या 15 ओव्हर्स असताना मी हस्तांदोलन करणार होतो," असा खुलासा त्याने केला.
"मी म्हटल्याप्रमाणे, हॅरी ब्रूक हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्यावर गोलंदाजीचा भार आहे. पण मला त्याला 'काहीही मूर्खपणा करू नकोस' असं सांगावं लागलं. आपण मैदानात बराच वेळ घालवला, असून उगाच वेगळं काही करून दाखवू नको. स्वाभाविकच, तुम्ही गोलंदाजी केली नसली तरीही तुम्ही थकलेले असाल. म्हणून मी असे म्हणत होतो की, फक्त या टप्प्यातून बाहेर पडा. पण हो, जेव्हा आम्हाला माहित होते की काय चालले आहे तेव्हा मी माझ्या योग्य गोलंदाजीच्या पर्यायांपैकी कोणताही धोका पत्करणार नव्हतो," असं तो पुढे म्हणाला.
Generative AI Apps - Udemy™ Online Courses
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे या विषयावर अगदी उलट मत होते. गंभीरच्या मते, सामना अनिर्णित राहणार असला तरी जडेजा आणि सुंदरसारखे फलंदाज शतके झळकावण्यास पूर्णपणे पात्र होते. चौथ्या कसोटीचा शेवट ज्या पद्धतीने झाला आहे त्यामुळे केनिंग्टन ओव्हलवरील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यासाठी अपेक्षा स्पष्ट झाल्या आहेत. 1-2 ने पिछाडीवर असलेल्या भारताला जर मालिका अनिर्णित ठेवायची असेल तर पुढील सामन्यात इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल.