Pune | Thu, 09 October 2025

Ad

'मी अरुण गवळीचा पीए बोलतोय, मला ५ कोटी दे' - खंडणीची मागणी -पुण्यातील भयंकर प्रकार

Sunil Goyal | 31 views
'मी अरुण गवळीचा पीए बोलतोय, मला ५ कोटी दे' - खंडणीची मागणी -पुण्यातील भयंकर प्रकार

पुणे : ‘अरुण गवळीचा पीए बोलतोय, 5 कोटी दे’, असे म्हणत व्यावसायिकाकडून 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना पुण्यात गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी 49 वर्षीय व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित चौरे, रोहन गवारे, सुदर्शन गायके, महेंद्र शेळके आणि कृष्ण बुधनर असे आरोपींची नावे असून यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचे बीडचे असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे पुण्यातील कॅम्प परिसरात ऑफिस आहे. 2022 मध्ये यातील आरोपी सुमित चौरे यांच्याशी एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात फिर्यादी यांचा व्यवहार झाला होता. 2023 मध्ये एक बांधकाम पूर्ण झाले, मात्र ते अनधिकृत असल्याने पुणे महापालिकेने ते तोडून टाकले. आर्थिक नुकसान झाल्याने या बाबतीत पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

“मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पीए बोलत आहे.”


त्यानंतर 28 जुलै रोजी फिर्यादींना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. यावेळी फोन करणारी समोरची व्यक्ती म्हणाली की, “मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पीए बोलत आहे.” त्यानंतर सुदर्शन गायके आणि त्याच्या साथीदारांनी वारंवार फोन करून 5 कोटी रुपये देऊन ‘मॅटर’ सेटल करण्याचा दबाव आणला, असा आरोप आहे.

4 ऑगस्ट रोजी गायके आणि त्याचा मित्र हे फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी “प्रशांत पाटील हे ‘डॅडी’ यांचे खाजगी सचिव आहेत, त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये आणून बसवतो” अशी धमकी देऊन ते निघून गेले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp