सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा क्रीडा विभाग समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालय जलतरण स्पर्धेचा रोमहर्षक थरार शारदाबाई पवार कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालया शारदा नगर बारामती या ठिकाणी पार पडला.
यामध्ये श्री रामचंद्र महाविद्यालयाचे खेळाडू ऋषिकेश हरगुडे यांनी फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच बटरफ्लाय जलतरंन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून श्रीरामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाचे नाव पुणे विद्यापीठ तसेच पुणे विभागात केले त्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव श्री शंकर रामचंद्र भुमकर यांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले व यापुढे विद्यार्थ्यांना व खेळाडूंना ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या उपलब्ध करून देण्याचे तयारी संस्थेचे क्रीडा संचालिका डॉ.सुषमा तायडे यांना दर्शवली .
यापुढे विद्यार्थ्यांनी खेळाप्रमाणेच अभ्यासाकडे पण लक्ष द्यावे असेही ते म्हणाले याबद्दल क्रीडा संचालिका डॉ.सुषमा तायडे यांनी संस्थेचे आभार मानले याप्रसंगी संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर प्राचार्य अविनाश देसाई तसेच टेक्निकल डायरेक्टर सिद्धांत भूमकर व महाविद्यालयाचे विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते .
श्री भीमराव बोरुडे श्री विकास गायकवाड श्री सागर शिंदे नीलम कुमारी ज्योती मिया पुरोहित व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते