हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए आणि इतर शासकीय यंत्रणांच्या संयुक्त मोहिमेत माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
गट क्रमांक १६६ मधील २८ अनधिकृत बांधकामे व विप्रो सर्कल परिसरातील माऊली हॉटेलवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होत असल्याने त्यावर कारवाई केली जात आहे.
अनधिकृत बांधकामे हटवा, प्रशासनास सहकार्य करा !
असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांनी केले आहे.