Pune | Thu, 09 October 2025

Ad

माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेप - 10 लाखांचा दंड

Sunil Goyal | 45 views
माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेप - 10 लाखांचा दंड

माजी PM च्या नातवाला शिक्षा

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि माजी लोकसभा खासदार Prajwal Revanna यांना बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला होता.

काल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते आणि आज शिक्षेची सुनावणी झाली. Prajwal Revanna यांना जन्मठेपेसोबतच ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण कर्नाटकमधील असून, २०२०-२१ मधील Lockdown च्या काळात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

या घटनेचे व्हिडिओ देखील बनवण्यात आले होते आणि महिलेला धमकावून शांत बसण्यास भाग पाडले होते अशी माहिती समोर आली आहे. Prajwal Revanna यांना व्हिडिओग्राफिक स्वरूपातील असे साहित्य बाळगल्याबद्दलही शिक्षा झाली आहे. अटकेपासून Prajwal Revanna कारागृहात आहेत आणि आता त्यांना आपले उर्वरित जीवन कारागृहातच व्यतीत करावे लागणार आहे.

या शिक्षेविरोधात ते वरच्या न्यायालयात अपील करतील अशी शक्यता आहे. हे त्यांच्यावरील अनेक प्रकरणांपैकी पहिले प्रकरण आहे ज्यात त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कर्नाटक -हसन येथील जनता दल (सेक्युलर) पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी निर्णय देत रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2) आणि 376(2)(एन) अंतर्गत गुन्हेगार ठरवले. या शिक्षेसोबतच न्यायालयाने रेवण्णा यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यापैकी ७ लाख रुपये पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.


बेंगळुरूमधील लोकप्रतिनिधीं विरोधातील गुन्ह्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. निकाल ऐकून प्रज्वल रेवण्णा न्यायालयाच्या आवारात भावुक झाले असल्याचे सांगण्यात येते.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp