Pune | Thu, 09 October 2025

Ad

भारतात अवैध्य वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन केली कारवाई

Sunil Goyal | 47 views
भारतात अवैध्य वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन केली कारवाई

भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करणेकरीता मा. वरीष्ठांचे आदेशाने विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. दि.११/०८/२०२५ रोजी गुन्हे शाखेचे विशेष पथक हे आंबेगाव कात्रज परीसरात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल घावटे व प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या माहितीवरून माऊली नगर, सुखसागर, पुणे येथे छापा टाकला असता महिला नामे १) मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून, वय २२ वर्षे २) मोनीरा बेगम, वय २६ वर्षे रा. मुळगाव गुजिया, शिबगंज, जिल्हा बोगरा, ढाका बांगलादेश अशा ०२ महिला मिळून आल्या. नमुद महिलांकडे चौकशी केली असता त्यांचेकडे बांगलादेश देशाचे ओळखपत्र व जन्म प्रमाणपत्र मिळुन आल्याने त्यांनी भारतात विना परवाना घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश करून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.


सदर महिलांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अदयापपर्यंत भारतात विनापरवाना घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश करून आतापर्यंत एकुण ०८ बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई केली आहे.


सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे शाखा श्री.निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहीद, पठाण गुन्हे शाखा, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शितल जमदाडे, नेहा तापकीर यांनी केली आहे.


Manoj Goel

Pune Pradinidhi


आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp