Pune | Thu, 09 October 2025

Ad

मस्ती करायची नाही'... आमदारासमोरच हिंजवडी पोलिसांची ग्रामस्थांना दादागिरी

Sunil Goyal | 105 views
मस्ती करायची नाही'...  आमदारासमोरच हिंजवडी पोलिसांची ग्रामस्थांना दादागिरी

हिंजवडीत आय.टी. पार्क वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थानी हिंजवडी ,माण परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलिस बळाचा वापर केल्या जात असल्याचा आरोप केला. याचा प्रत्यय समोर आलेल्या एका व्हिडीओतून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अजितदादांच्या आमदारासमोरच हिंजवडी पोलिसांनी ग्रामस्थांना दादागिरी केल्याचे दिसते. ही घटना सध्या शहरात चर्चेला विषय ठरत असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हिंजवडी, माणमधील अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात देखील केली. या कारवाईदरम्यान एक नागरिक पोलिसांना विचारतो, “कोणती नोटीस दिलीत? कोणत्या आदेशाने आलात?” यावर पोलिस अधिकारी बालाजी पांढरे यांनी संतप्त होऊन त्याला धक्के मारत शिवीगाळ केली, तसेच अटक करण्याची धमकी दिली. संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत झाला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या समोर हा प्रकार घडला. मात्र, त्यांनी यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. पोलिसांच्या अशा दादागिरी समोर गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे . या घटनेचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने हिंजवडी मान ग्रामस्थांमध्ये पोलिस आणि पीएमआरडीए प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp