मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ४० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान असलेल्या आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाल्याचे आज जाहीर केले आहे. नेमक्या याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत युती आघाडी होत असतात. काही जणांची युती जनतेसाठी होते, जशी आमची महायुती आहे. आता झालेल्या युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवेसना स्टार प्रचारकांची यादी
एकनाथ शिंदे, मुख्य नेते व उपमुख्यमंत्री
रामदास कदम, नेते
गजानन कीतीकर, नेते
आनंदराव अडसूळ, नेते
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते