Pune | Thu, 09 October 2025

Ad

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे-भाजपा आमदार महेश लांडगे भडकले

Sunil Goyal | 35 views
गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे-भाजपा आमदार महेश लांडगे भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले; गोरक्षकांवरील खोट्या केसेस आम्ही खपवून घेणार नाही


गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली.


इंदापूर येथे मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीजवळील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.


तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि गोरक्षकांच्या त्रासाबद्दल तक्रार केली. त्यानंतर अजित पवारांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे.


आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp