Pune | Fri, 10 October 2025

Ad

चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Sunil Goyal | 8 views
चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात  – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. ३० : चाकण चौक तसेच चाकण एमआयडीसी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. मंत्रालयात चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत उपाययोजना राबवण्याविषयी बैठक झाली त्यावेळी मंत्री श्री भोसले बोलत होते.

नाशिक फाटा ते खेड रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास द्यावयाची पत्राची कार्यवाही आजच करण्यात यावी अशा सूचना देऊन मंत्री श्री. भोसले म्हणाले की, एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे एमआयडीसीने भरावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे नियोजन करावे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून अस्तित्वातील रस्त्यावर आणखी एक मार्गिका तातडीने सुरू करावी. एमआयडीसीने त्यांचा ७५ मीटर रुंदीचा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांची कामेही तातडीने करून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावीत. तळेगाव, चाकण, शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देऊन काम करावे अशा सूचनाही मंत्री श्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

०००००

हेमंतकुमार चव्हाण /वि.सं.अ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp