Pune | Fri, 10 October 2025

Ad

गडचिरोली जिल्ह्यातील अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

Sunil Goyal | 5 views
गडचिरोली जिल्ह्यातील अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

मुंबई, दि.१९ : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली महामार्गावर ७ ऑगस्ट रोजी पहाटे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दिशांत दुर्योधन मेश्राम (१५), तुषार राजेंद्र मारबते (१४) यांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाख रूपये या प्रमाणे वीस लाखांची मदत केली. तर, गंभीर जखमी क्षितीज तुळशीदास मेश्राम (१४) आणि आदित्य धनंजय कोहपरे (१५) या दोघांना तातडीने हेलिकॉप्टरने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुःखद घटनेबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृत विद्यार्थ्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना धीर दिला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरूणांच्या संपुर्ण उपचाराची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली असून त्यात कोणतीही कमतरता राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या अपघातात प्राण गमावलेल्या तरूणांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp