Pune | Fri, 10 October 2025

Ad

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 8 views
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०१साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समजाला दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात स्थित अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी ज्वलंत ठेवले आणि वंचितांचा आवाज समाजामध्ये पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी असल्याची मांडणी त्यांनी आपल्या साहित्यातून केली. त्यांनी दाखवविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर चालण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजित वंजारी आणि संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp