Pune | Fri, 10 October 2025

Ad

राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

Sunil Goyal | 5 views
राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार प्रबंधक एस. राममूर्ती यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा देण्यात आली.

“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची” प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते.

 

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp