Pune | Fri, 10 October 2025

Ad

उद्योजकांनी पर्यावरणपुरक व प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे – मंत्री पंकजा मुंडे

Sunil Goyal | 8 views
उद्योजकांनी पर्यावरणपुरक व प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे – मंत्री पंकजा मुंडे

नाशिक, दि. ०२: नाशिक मध्ये सुरू असलेले नवनवीन प्रकल्प व उद्योगांच्या माध्यमातून नाशिक औद्यगिक हब म्हणून नावारूपास येत आहे. त्याअनुषंगाने उद्योजकांनी पर्यावरणपुरक व प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले

नाशिक इडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयएमए) यांच्या  प्रतिनिधीसोबत   पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे,  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, उप सचिव तांत्रिक डॉ .राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, नीमाचे अध्यक्ष आशिष नहार,  आयमाचे अध्यक्ष  ललित बूब,उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जळगाव उप प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत,धुळे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, अहिल्यानगर उप प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे वैज्ञानिक अधिकारी सुरेश माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की,  नवनवीन उद्योग व उद्योजकांना बळ देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  शासन कटिबद्ध आहे.  तसेच उद्योजक व कंपन्या आस्थापनांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करावे.  प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांचे  आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी.

सिंहस्थाच्या माध्यमातून  नाशिकमध्ये शाश्वत कामे  होत आहेत.तसेच उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी  उद्योग विभागाकडूनआवश्यक निधी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे  यांनी सांगितले.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp