पुणे अहिल्यानगर महामार्गावर विशेषता वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते, अनेक दिवसापासून वाघोलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रयत्न सुरू आहेत .
याच अनुषंगाने काही चौकामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करून वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह डीसीपी हिम्मत जाधव रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे,
रस्त्यावर उतरून स्वतः अप्पर पोलीस आयुक्तांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.आता त्यांच्या प्रयत्नाला किती यश येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.