Pune | Thu, 09 October 2025

Ad

मोबाईलवर फोटो काढून चालान केल्यास आता पोलिसांवर कारवाई – महाराष्ट्र पोलीस विभागाचा मोठा निर्णय

Sunil Goyal | 43 views
मोबाईलवर फोटो काढून चालान केल्यास आता पोलिसांवर कारवाई – महाराष्ट्र पोलीस विभागाचा मोठा निर्णय

मुंबई :-

महाराष्ट्र पोलीस विभागाने वाहतूक पोलिसांना चालान काढताना वैयक्तिक मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ई-चालान मशीन द्वारेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करता येईल.


जर एखादा पोलीस कर्मचारी स्वतःच्या मोबाईलने फोटो काढून चालान काढताना आढळला, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.


या निर्णयाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे:


भ्रष्टाचाराला आळा घालणे


पारदर्शकता वाढवणे


वाहनचालकांचा विश्वास जपणे


🚫 अनेक तक्रारी आणि व्हायरल व्हिडीओंमध्ये पोलिस कर्मचारी स्वतःच्या मोबाईलचा वापर करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा निर्णय आता कडकपणे अंमलात आणण्यात येणार आहे.


पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी सर्व जिल्ह्यांना याबाबत परिपत्रक पाठवले असून सर्वांना फक्त अधिकृत ई-चालान डिव्हाईस च वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp