पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा या महाविद्यालयाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी व पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या अमूल्य सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वललाने झाली. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करून, समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती आदर आणि आपुलकी निर्माण होणे हेच आपल्या शिक्षणाचे खरे स्वरूप आहे.
आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी शेवाळे यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थिनींनी सफाई कर्मचारी व पोलीस बांधवांना राख्या बांधल्यावर औक्षण करून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. तुमच्यामुळेच आमचे जीवन सुरक्षित आणि स्वच्छ आहे अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सफाई कर्मचारी श्री. ऋषिकेश जाधव यांनी सांगितले की "आज एवढ्या वर्षांनी आमचं कार्य कोणीतरी ओळखलं याचा खूप आनंद झाला."पुणे महानगर पालिकेचे मा.नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि सौ. ज्योती भालेराव यांचे याबाबतीत मोलाचे सहकार्य लाभले.यामधे श्री. राजू गायकवाड, भरत सोळंकी, श्री. लोकेश मिनिकर आणि श्री. रामा साठे उपस्थित होते
.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खराडी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन सर्व पोलिस बांधवाना राख्या बांधून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. यावेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थीनीचे पोलिस कर्मचाऱ्यांनी कौतुक करून, कधीही कोणत्या संकटात सापडला तर आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.प्रगती मासळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा.अश्विनी बनकर, प्रा.ज्योती दारकुंडे, प्रा. ऐश्वर्या निचळ,ग्रंथालय प्रमुख कांचन बुचडे,सौ. अरुणा चिगरे,श्रीमती मनीषा झाल्टे, श्री. सतीश खोपकर, जगदीश पठारे,सागर पठारे आदींचे सहकार्य लाभले.