संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सकाळी 11.30 वा. येरवडा येथे आगमन झाले. आदर्श मित्र मंडळ येरवडा ग्रामस्थ तसेच हिंदू युवा क्रांती संघटनेतर्फे या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांचे येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण काशीतकर तसेच हिंदू युवा क्रांती संघटनेचे सचिव अनिल जमदाडे यांनी स्वागत केले. गेली 40 वर्षापासून आदर्श मित्र मंडळातर्फे येरवड्यातील अनेक मंडळात सामाजिक कार्यकर्ते तसेच हिंदू युवा क्रांतीतर्फे पालखी सोहळ्यातील प्रमुख विणकरी व वारकरी बांधवांना दूध केळी गुडदाणी चिवडा याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा लावून माऊलीचे दर्शन घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येरवड्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोझे राजू ढगे राहून शिवरकर जितेंद्र शेलार संजय सुनील परदेशी सुदाम तमनर तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या व भाविक उपस्थित होते