खराडी. - खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, काव्य लेखन अशा साहित्यिक- सांस्कृतिक स्पर्धांबरोबरच विविध शैक्षणिक सेमिनारचेही आयोजन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने श्री योगेश काकरंभे( डेप्युटी मॅनेजर सिपला प्रा. लि) यांचे "फार्मासिस्ट फ्युचर हेल्थ लीडर " या इंडस्ट्री एक्सपर्ट सेमिनारचे आयोजन करण्यात आले.डॉ. मुरुगन अप्पूपिलाई यांचे "अवेअरनेस ऑफ रेबीज" यावर तसेच क्लब मँगो फ्रेंडस या व्यासपीठांतर्गत प्रतीक्षा वावळे यांचे कॉलेज वयोगटातील युवक युवतींना मन, प्रतिभा आणि आत्म्याला दिशा देणाऱ्या "स्टुडन्ट मेंटोरींग प्रोग्रॅम "चे आयोजन करण्यात आले.
ज्यामध्ये क्लबचे आधारस्तंभ श्रीकल्प यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संस्था स्तरावर आयोजित 'अजित जनरल नॉलेज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम'मध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.महाविद्यालयाच्या परिसरामधे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मा.श्री.रविन्द्र पठारे(सामाजिककार्यकर्ते) उपस्थित होते.प्लास्टिक कलेक्शन सारखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता वाढविण्याचा कायमच प्रयत्न केला जातो.
तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सायकल रॅली स्पर्धेत दिलेली जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीचा आनंद घेतला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बनकर, प्रा. ज्योती दारकुंडे, प्रा.प्रगती मासाळकर ,प्रा. ऐश्वर्या निचळ, ग्रंथालय विभाग प्रमुख कांचन बुचडे, सौ अरुणा चिगरे, श्रीमती मनीषा झाल्टे, श्री. सतीश खोपकर, श्री सागर पठारे, जे.डी पठारे उपस्थित होते.
Manoj Goel
pune praditidhi