मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८, मंगळवार दि. ९, बुधवार दि. १०, गुरुवार दि. ११ आणि शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच “News on AIR” या मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ऐतिहासिक स्मारके, स्थळे आणि कलाकृतींचा शोध, अभ्यास आणि दस्तावेजीकरण करणे, तसेच त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी ‘राज्य संरक्षित स्मारके’ म्हणून मान्यता देणे, आदी महत्वाच्या कामांसाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय कार्यरत आहे. आपल्या वारसास्थळांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे, ऐतिहासिक स्थळांचा उज्ज्वल इतिहास प्रकाशात आणणे आदी महत्वाची कामे संचालनालयामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. तसेच आग्रा येथील स्मारक उभारणी, जेएनयूतील अभ्यासकेंद्र, रघुजी भोसले यांचा इतिहास, ‘राजगड’ नामकरणाची पार्श्वभूमी, वाघनखे महाराष्ट्रात आणणे इत्यादी महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. याविषयी संचालक डॉ. गर्गे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/