Pune | Thu, 09 October 2025

Ad

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राज्याच्या आगामी राजकीय वाटचाली

Sunil Goyal | 187 views
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राज्याच्या आगामी राजकीय वाटचाली

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात राज्याच्या आगामी राजकीय वाटचाली संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या चर्चांना या दौऱ्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. काही मंत्र्यांची खातीही बदलली जाऊ शकतात. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन हे बदल केले जातील.

महायुती सरकारच्या पुढील रणनीतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांमध्ये चर्चा केली, ज्यामुळे राज्याच्या राजकीय आणि विकासात्मक आघाडीवर निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत महाराष्ट्र सदनात एक तासभर बंद दाराआड चर्चा केली. सूत्रांनुसार, या चर्चेत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सविस्तर बोलणे झाले. कोकाटे यांच्याबद्दलची नेमकी भूमिका तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्याचे समजते.


आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp