मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत ते ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहेत.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 15 ते गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 दरम्यान सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येईल. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक तापमानवाढीला प्रतिसाद देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली असून, या संदर्भात भारताने आणि त्यानंतर महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. वातावरणीय बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पावले उचलली असून यासाठी ‘हरित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी लाखो हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा,पर्यावरणाला शाश्वत दिशा मिळणार आहे. याच अनुषंगाने 18 सप्टेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात ‘बांबू परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसंदर्भात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/