Pune | Mon, 01 June 2026

Ad

Sunil Goyal | 100 views

पुणे प्रतिनिधी:-


समाजातील दुर्लभ,उपेक्षित आणि गरजू घटकांच्या जीवनात आशीचे किरण निर्माण करणारा एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला भेदणारा सामाजिक उपक्रम लोणी काळभोर मधील सचिन मखर व त्यांच्या मित्र परिवाराचा मोठ्या उत्साहात पार पडला, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, पुणे ग्रामीण मंडळाचे "सचिव" सचिन मखर यांच्या पुढाकाराने तसेच त्यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने अनाथ आश्रम आश्रमातील बालक,वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या गरजू नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.


 या उपक्रमा अंतर्गत तेल, साबण,कंगवा, टूथब्रश,कोलगेट व फायबर बॉक्स, बिस्कीट पुडे तसेच स्वच्छता व दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साहित्य असलेली किट्स लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली या मदतीमुळे गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद समाधान आणि कृतज्ञतेचे भाव उमटल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले या सामाजिक उपक्रमात दत्तात्रय शिंदे, सुमंत लोखंडे,अमन कुंभार, किशोर चव्हाण,अमोल तांगडे, प्रज्वल भांड यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवली. "देणं हेच खऱ्या आनंदाचे मूळ आहे" या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला,याच उपक्रमाचा विस्तार म्हणून देवाची उरुळी,वडकी, हडपसर, पूलगेट, स्वारगेट,पुणे रेल्वे स्टेशन तसेच ससून हॉस्पिटल परिसरातील बेवारस व रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुमारे 200 किटचे वाटप करण्यात आले प्रत्येक किट ची किंमत अंदाजे १५० रुपये असून स्वच्छता व दैनंदिन गरजा लक्षात घेऊन ते किट तयार करण्यात आले होते .

या कार्यक्रमादरम्यान समाजात सहानुभूती माणुसकी आणि एकोप्याची भावना अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली तसेच असे उपक्रम सातत्याने राबवून अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. समाजातील प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर अनेक निराधारांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो हा प्रभावी संदेश सचिन मखर व त्यांच्या मित्र परिवार यांनी या उपक्रमातून देण्यात आला.


संतोष बी. कोळी



आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp