Pune | Mon, 16 March 2026

Ad

शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू डॉ.सुषमा तायडे यांना गौरव मानचिन्ह देऊन सन्मानित

Sunil Goyal | 34 views
शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू डॉ.सुषमा तायडे यांना गौरव मानचिन्ह देऊन सन्मानित

शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू डॉ.सुषमा तायडे यांना गौरव मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने वार्षिक क्रीडा पारितोषक समारंभा पुणे विद्यापीठात पार पडला याप्रसंगी अनेक खेळाडू तसेच अनेक क्रीडा संचालकांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे श्रीरामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांनी युवकांच्या क्रीडा विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची दखल घेत श्री राजीव जालनापुरकर यांच्या हस्ते गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.सुषमा तायडे यांनी युवकांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग वाढवा यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुणे विद्यापीठातील तसेच इतर ठिकाणचे अनेक युवकांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे या गौरव सोहळ्यात उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करत असताना सांगितली की एका सामान्य कुटुंबातून असताना सुद्धा खेडेगावातून येऊन क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक केले आहे त्यामुळे त्यांना भारताचे राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते डॉ. तायडे यांना राष्ट्रीय पदक मिळाले आहेत तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या महिला हॉकी संघाचे व्यवस्थापक आणि महाराष्ट्र सॉफ्टबॉल क्रिकेट महिला संघाचे प्रशिक्षक खेलो इंडिया मध्ये सुद्धा प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

हॉकी आणि बॉल बॅडमिंटन मध्ये सहा राष्ट्रीय प्रमाणपत्र आणि हॉकीमध्ये पाच अंतर विद्यापीठ प्रमाणपत्र मिळालेले आहे युवकांचे सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले योगदानाचे कौतुक केले डॉ. सुषमा तायडे यांच्या अथक प्रयत्नामुळे युवकांमध्ये क्रीडा विषयी जागृती आणि ऊर्जा निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ऑलिंपिक खेळाडू कविता राऊत पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ.सुरेश गोसावीसर , डॉ. पराग काळकर सर तसेच क्रीडा संचालक सुदाम शेळके सर अनेक विद्यार्थी खेळाडू क्रीडा संचालक शिक्षक उपस्थित होते डॉ. तायडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रामचंद्र एज्युकेशन संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच संस्थापक अध्यक्ष सचिव खजिनदार प्राचार्य यांनी त्यांना मिळालेल्या गौरव मानचिन्ह बद्दल व त्यांच्या पुढील कारकीर्द शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp