Pune | Fri, 10 October 2025

Ad

आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तासिकेचे वेळापत्रक तयार करा – मंत्री डॉ. अशोक वुईके

Sunil Goyal | 7 views
आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तासिकेचे वेळापत्रक तयार करा – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. ४ : आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर अतिरिक्त तासिका घेण्याबाबत वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना दिले.

मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आश्रमशाळा मधील शिक्षक भरती संदर्भात बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, आदिवासी विकास विभागातील सर्व अप्पर आयुक्त, सर्व प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळा मुख्याध्यापक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. शिक्षकांची रिक्त पदे ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अडथळा ठरत होती. आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर शासनाने बाह्यस्रोत पद्धतीचा अवलंब करून शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्यस्रोताद्वारे नियुक्त शिक्षकांनी संबंधित आश्रमशाळेत तातडीने कार्यभार स्वीकारणे आवश्यक आहे. ज्या शिक्षकांनी आपला कार्यभार स्वीकारला नाही याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. याशिवाय प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आश्रमशाळांना भेट देऊन पाहणी करावी व त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp