Pune | Thu, 09 October 2025

Ad

ब्रिटनचे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर यांचे मुंबई येथे आगमन

Sunil Goyal | 5 views
ब्रिटनचे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई दि. ८  : ब्रिटनचे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज सकाळी आगमन झाले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, 

मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, भारताचे ब्रिटन येथील हाई कमिशनर विक्रम दोराईस्वामी, पोलीस आयुक्त  देवेन भारती, भारत सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अमित कुमार, अतिरिक्त सचिव (इ डब्लू), भारत सरकार श्री पीयूष श्रीवास्तव,  आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp