Pune | Fri, 10 October 2025

Ad

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

Sunil Goyal | 19 views
ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

मुंबई, दि. ३ : कडून जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.वर्ष २०२५ मध्ये राज्यातील २४ केंद्रांमधून एकूण १४६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८४५  विद्यार्थी उत्तीर्ण व ६१९विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेच्या निकालाची एकूण टक्केवारी ५८ इतकी आहे. राज्यात सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग केंद्राचा ९२ टक्के आहे.

परीक्षेचा निकाल ग्रंथालय संचालनालयाच्या https://dol.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रांवर पाठविण्यात येत आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत काही त्रुटी असल्यास त्याची दुरुस्ती करायची असल्यास किंवा प्राप्त गुणांबाबत फेर गुण मोजणी करायची असल्यास त्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी १० रुपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापक यांच्याकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp