Pune | Fri, 10 October 2025

Ad

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मच्छीमार समाजासाठी नवे पर्व

Sunil Goyal | 9 views
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मच्छीमार समाजासाठी नवे पर्व

मुंबईदि. ४ : राज्य शासनाने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी क्षेत्रातील सर्व सुविधायोजनांचा लाभ आणि बँक कर्जासंबंधी सवलती मिळणार आहेत.

महाराष्ट्रात ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा असूनकोकण किनारपट्टीपासून विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यपालनापर्यंत लाखो कुटुंबे थेट मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत. आतापर्यंत कृषी आणि मत्स्यव्यवसाय या दोन क्षेत्रांत वेगळे धोरणात्मक निकष असल्याने मच्छीमारांना अनेक सवलतींपासून वंचित राहावे लागत होते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जअनुदानविमा संरक्षणाच्या योजनांचा लाभ मच्छीमारांना मिळत नव्हता.

निर्णयाचे फायदे

१. कर्जसुविधा :

मत्स्यपालकांना आता बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यामुळे मत्स्यव्यवसायाचा विस्तार आणि आधुनिकीकरण शक्य होईल. किसान क्रेडिट कार्डही मच्छीमारांना मिळेल.

२. शासकीय योजना व अनुदान :

मत्स्यव्यवसायाला आता कृषी योजनांचा लाभ मिळेल. पायाभूत सुविधा उभारणीशीतगृहे (cold storage), मत्स्य प्रक्रिया उद्योग यासाठी शासन मदत करेल.

३. विमा संरक्षण :

हवामान बदलचक्रीवादळेपूर यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कृषी विम्यासारख्या योजनांत मच्छीमारांचा समावेश होणार आहे. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास विमा योजना लागू असेल.

४. तांत्रिक व संशोधन साहाय्य :

कृषी विद्यापीठेसंशोधन केंद्रे आणि तांत्रिक संस्था मत्स्यपालकांना आधुनिक तंत्रज्ञानवैज्ञानिक मार्गदर्शन उपलब्ध करून देतील.

५. रोजगार व निर्यात वाढ :

ग्रामीण आणि किनारी भागात मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रक्रिया उद्योग वाढीस लागतील. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि मत्स्य उत्पादन निर्यातीतून राज्याला परकीय चलन मिळेल.

या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मच्छीमार समाजाला सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. मत्स्यपालनाला कृषीशी समान दर्जा मिळाल्याने या व्यवसायाचा दर्जा उंचावेल.

या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात जलशेती हा स्वतंत्र व टिकाऊ व्यवसाय म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी मासेमारीबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला नवी उभारी मिळेल. त्याचबरोबर ग्रामीण भागात शीतगृहेमत्स्य प्रक्रिया उद्योगनिर्यात साखळी उभारली जाणार आहे.

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा हा फक्त धोरणात्मक बदल नाही तर मच्छीमार समाजासाठी नवे पर्व आहे. शेतकरी आणि मच्छीमार यांच्यातील असमानतेची दरी मिटवून दोन्ही क्षेत्रांना समसमान सन्मान मिळवून देणारा हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp