Pune | Fri, 10 October 2025

Ad

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर व्यक्त केले समाधान

Sunil Goyal | 12 views
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर व्यक्त केले समाधान

सातारा दि.६– गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्गाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासना मार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजना पाहून समाधान व्यक्त केले.
या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.
पाहणी प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने सातारा शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड व कृत्रिम तलाव उभारण्यात आलेले आहेत. या तलावांमध्येच नागरिकांनी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करावे. जे डॉल्बी चालक आवाजाची मर्यादा पाळणार नाहीत अशा डॉल्बींवर कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गेल्या दहा दिवसात ज्याप्रमाणे शांततेत गणेशोत्सव साजरा झाला त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या दिवशीही नागरिकांनी शांततेत व उत्साहात गणेश विसर्जन करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले
000
आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp