Pune | Sun, 15 February 2026

Ad

राजधानीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Sunil Goyal | 9 views
राजधानीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि.२० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली.

यावेळी आर. विमला यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp