
मुंबई, दि. ०६ : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :
नगरपरिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे)
अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित नगरपरिषदा (17 पदे)-
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषदा (16 पदे)
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित नगरपरिषदा :-
अनुसूचित जमातीसाठी एकूण 11 पदांपैकी 6 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित (6 पदे)
अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग (5 पदे)
नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नगरपरिषदा :-
एकूण 247 नगरपरिषदांमधून 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील (सर्वसाधारण) आरक्षित पदे (33 पदे)
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदे (34 पदे)
खुल्या प्रवर्गातील नगरपरिषदांचे आरक्षण
एकूण 247 पैकी 136 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यापैकी 68 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
1 फलटण, 2 अहमदपूर, 3 पाथरी, 4 चाळीसगांव, 5 तळोदा, 6 वाई, 7 नांदगांव, 8 जयसिंगपूर, 9निलंगा, 10 लोहा, 11 खोपोली, 12राजगुरूनगर 13 कराड, 14जेजुरी, 15 उमरगा, 16आळंदी, 17 पुसद, 18 बारामती 19 जत, 20. पारोळा, 21तळेगांव-दाभाडे, 22सासवड, 23 गडचांदुर, 24 रिसोड, 25 वेंगुर्ला, 26 पातूर, 27 किल्लेधारुर, 28 चिखली, 29 मेहकर, 30 दारव्हा, 31 सिल्लोड, 32 सिन्नर, 33 देवळी, 34 मुरूम, 35 वडगांव, 36 महाबळेश्वर, 37 आष्टा, 38 दुधणी, 39 कुंडलवाडी, 40 खुलताबाद, 41नरखेड, 42 राजूरा, 43 सिंदखेडराजा, 44 वाडी, 45 डहाणू, 46 देवळाली-प्रवरा, 47 कामठी, 48 अक्कलकोट, 49 सातारा, 50 भोर, 51 इंदापूर, 52 चिपळून, 53 माथेरान, 54 श्रीगोंदा, 55 श्रीरामपूर, 56 मनमाड, 57 नळदुर्ग, 58 भोकर, 59 बिलोली, 60 अंबेजोगाई, 61 जिंतूर, 62 सोनपेठ, 63 गंगापूर, 64 पांढरकवडा, 65 घाटंजी, 66 मुर्तीजापूर, 67 चिखलदरा, 68 तुळजापूर.
खुला प्रवर्गाताली महिलांसाठी नगरपरिषदा
नगरपंचायतीचे आरक्षण
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव :-
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)
1 .निलडोह, 2. गोधनी(रेल्वे), 3. कोरची, 4. बहादुरा , 5. धानोरा, 6. गौंडपिंपरी, 7. ढाणकी , 8. अहेरी , 9. बेसा-पिपळा
अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)
येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-
महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)
भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा , हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)
कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू , सिंदेवाही
नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे):-
सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस , एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा , माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले , मोखाडा, सुरगणा.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)
घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि. वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.
खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)
खुला (सर्वसाधारण) (38 पदे)
शेंदूर्णी , साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)
आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/