Pune | Thu, 09 October 2025

Ad

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत

Sunil Goyal | 6 views
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी’या विषयावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार, दि. १३, मंगळवार, दि. १४, बुधवार दि. १५ आणि गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आजारांवर गुणवत्तापूर्ण, मोफत आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रित स्वरूप देऊन लाभाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. सुरुवातीला अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १३५६ उपचार व शस्त्रक्रिया समाविष्ट असून आतापर्यंत ८२ लाखाहून अधिक उपचार व शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जात आहे. राज्य शासनाच्या ‘आरोग्यसुरक्षा सर्वांसाठी’ या ध्येयपूर्तीकडे जाणाऱ्या या योजनेंतर्गत पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळविण्याची प्रक्रिया आणि योजनांची अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती चव्हाण यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp