मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनच्या वतीने दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सोडत सभागृह उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय टी ब्लॉक, पहिला मजला, दाणा बाजार, एपीएमसी मार्केट, सेक्टर १९.बी. वाशी, नवी मुंबई -४००७०५ या ठिकाणी “महाराष्ट्र दसरा भव्यतम सोडत” काढण्यात आली.
या सोडतीमधून जनतेच्या “सर्वांगीण आर्थिक विकासासाठी” या ब्रिदवाक्याचा पुरेपुर अवलंब करण्यात आला. या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले (सामायिक) बक्षिस तिकीट क्रमांक DB-02 25597 रूपये ५०,००,०००/- चे एक बक्षिस अग्रवाल लॉटरी एजन्सी, धुळे येथील खरेदीदारास लागले आहे. रक्कम रू. १,००,०००/- ची २ बक्षिसे व रू. १००००/- च्या आतील रकमेची २९७० बक्षिसे लागली आहेत, असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. ६५,८०,५००/- इतकी होती.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रु. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा, महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी कळविले आहे.
०००