Pune | Thu, 09 October 2025

Ad

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा

Sunil Goyal | 6 views
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर येथे उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, समुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक साकारत आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्याबाबत संबंधित विभागास अवगत करण्यात आले आहे. पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुतळा विहित वेळेत उभा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp