मुंबई, दि. ७ : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत डांगे, अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
००००