मुंबई, दि. ७ : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महर्षी वाल्मिकी यांना यावेळी अभिवादन केले.
0000