Pune | Fri, 10 October 2025

Ad

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 5 views
पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.४ : ‘णमोकार तीर्थ’ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. फेब्रुवारी महिन्यात होणा-या ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्याच्या’ अनुषंगाने तात्काळ व दीर्घ कालावधीत होणा-या कामांचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे मालसाने येथील जैन समाजाच्या ‘णमोकार तीर्थक्षेत्र’, येथे ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळा’ आयोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार राहुल आहेर, उत्सव समिती सदस्य संतोष पेंढारी, जैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘णमोकार तीर्थ’ धर्मस्थळाचे मोठे महत्व आहे. ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठी  मोठया संख्येने भाविक येथे येतात.   हे लक्षात घेता  भाविकांसाठी रस्ते, तात्पुरते निवास, पार्किंगसह इतर तात्काळ  करावी लागणारी कामे प्राधान्याने करावीत.  स्थायी कामांमध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने जी कामे करता येतील ती देखील करावी. दीर्घ कालावधीत करता येणा-या कामांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, जेणेकरून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून ही कामे करता येतील, विकास आराखड्यातील स्थायी व अस्थायी कामांची यादी प्राधान्यक्रम घेऊन तयार करावी. विभागीय आयुक्त आणि स्थानिक प्रशासन व ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळा आयोजन समिती’ने याबाबतीत कामांच्या यादीचा  सुधारित प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

यावेळी आमदार राहुल आहेर व जैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी यांच्यासह महोत्सव समितीच्या सदस्यांनी महोत्सवाचे तसेच मंदिर परिसर विकासासाठीचे सादरीकरण केले.                                                0000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp