मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने सायं ५.१५ वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, अॅड. पराग आळवणी, मुरजी पटेल, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.
***