नवी दिल्ली, दि. 7 : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, उपअभियंता किरण चौधरी, प्र. उपसंचालक मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, सारिका शेलार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.
000