नवी दिल्ली, दि. ०२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र सदन येथे सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००