मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांचा स्वरसोहळा “मेरा साया साथ होगा” या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार असून शैलजा सुब्रमण्यम, आनंदी जोशी, निहिरा जोशी, जय आजगांवकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. निवेदन अंबरीश मिश्र करणार असून संगीत संयोजन प्रणव हरिदास यांचे आहे. या कार्यक्रमात १६ वादकांचा सहभाग आहे.
‘मेरा साया साथ होगा’ कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिका स्वा. सावरकर नाट्यगृह, शिवाजी पार्क, दादर येथे उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमाचा अधिकाधिक रसिक प्रेक्षकांनी लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ