Pune | Fri, 10 October 2025

Ad

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गझलसम्राट भीमराव पांचाळे यांची विशेष मुलाखत

Sunil Goyal | 7 views
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गझलसम्राट भीमराव पांचाळे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित गझलसम्राट पंडित भीमराव पांचाळे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 2, बुधवार दि. 3, गुरुवार दि. 4, शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ मोबाईल अॅपवर ऐकता येईल. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनी व  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही पाहता येणार आहे निवेदक स्मिता गवाणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच मुंबईत उत्साहात झाला. या सोहळ्यात ६० आणि ६१ व्या चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत प्रख्यात गझल सम्राट पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘गझल हेच व्रत, गझल हाच ध्यास’ या मंत्राने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे पांचाळे यांनी मराठी गझलेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यांच्या स्वरांनी शब्दांना नवी ओळख दिली, मराठी गझल साहित्याला समृद्ध केले. त्यांच्या समृद्ध प्रवासाबद्दल आणि गझलेच्या विविध पैलूंवर त्यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात संवाद साधला आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp