Pune | Mon, 16 February 2026

Ad

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

Sunil Goyal | 13 views
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहिमेवर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार असून पहिला भाग मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी तर दुसरा भाग मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.

आरोग्य विभागामार्फत ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंध, लवकर तपासणी व प्रभावी उपचार याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांनी विवाहपूर्व सिकलसेल तपासणीचे महत्त्व, रुग्ण व वाहकांची ओळख, गर्भावस्थेतील तपासणी तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

जनजागृतीच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार रोखणे शक्य असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने ‘अरुणोदय’ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp