Pune | Thu, 16 July 2026

Ad

‘जय महाराष्ट्र’मध्ये ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ विषयावर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची आज विशेष मुलाखत

Sunil Goyal | 11 views
‘जय महाराष्ट्र’मध्ये ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ विषयावर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची आज विशेष मुलाखत

मुंबई, दि. १४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमातून ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची आषाढी वारीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक आरोग्य सज्जता’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही विशेष मुलाखत मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. दिलखुलासकार्यक्रमातून या विशेष मुलाखतीचे दोन भाग दि. १६ आणि १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर तसेच न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन प्रणय चव्हाण यांनी केले आहे.

महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारीत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, निरोगी आणि अखंड आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून व्यापक आरोग्य सज्जता उभारली आहे. या सर्व नियोजनाचा सविस्तर आढावा या विशेष मुलाखतीतून घेण्यात आला आहे.

या मुलाखतीत आषाढी वारीसाठीचे आरोग्य नियोजन, पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, फिरती वैद्यकीय पथके, एअर ॲम्बुलन्स सेवा, ‘आरोग्यसंपन्न वारीडिजिटल ॲप, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, महाआरोग्य शिबिरे तसेच ‘प्रत्येक वारकरी ही माऊली आहे’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे.

०००

जयश्री कोल्हे/ स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp