
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई अधिनस्त असलेल्या सर्किट बेंच (कोल्हापूर) येथे प्रमुख न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी पोलीस विभागाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.याप्रसंगी न्यायमूर्ती श्री. अवचट यांनी उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, इतर न्यायाधीश, जेष्ठ विधीज्ञ यांच्यासह सर्किट बेंचचे इतर कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजवंदन
भारतीय 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये राधानगरी-कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र गीत व भारताच्या संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश विजय आदोने, अविनाश मालुंजकर, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, कामगार न्यायालयाच्या क्र. एक च्या न्यायाधीश मधुरा मुळीक, कै.बी.कामगौडा, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त शशिराज पाटोळे, सहा. आयुक्त संजय डोर, सचिन पाटील तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
