Pune | Sun, 15 February 2026

Ad

आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

Sunil Goyal | 9 views
आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई, दि. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे अपघाती निधन खूपच दुःखद आणि दुर्दैवी आहे. आम्ही आमच्या सर्वांचा मोठा आधार गमावला आहे, या व्यतिरिक्त भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी श्रध्दांजली व्यक्त केली.

मातीतील माणसाशी जोडलेले व्यक्तीमत्व, जनहिताला प्राधान्य देऊन, सडेतोडपणा जपून प्रशासनावर वचक असणारा कामाला प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख आमच्यासाठी प्रेरणादायी होती.

राज्यातील गोरगरीब जनतेसाठी, तळागाळातील लोकांसाठी काम करणारा नेता, महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा नेता आज आपण गमावला आहे. आजच्या या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबीयांवर व आम्हा सर्वांवर जो आघात झाला आहे त्या आघातातून सावरण्याची शक्ती सर्वांना मिळो. या शब्दात मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp