Pune | Sun, 15 February 2026

Ad

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

Sunil Goyal | 10 views
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२८ : मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली अशा शब्दांत कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली

कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की, जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती. तळागाळापर्यंत पोहोचलेला त्यांचा जनसंपर्क आणि मेहनती स्वभाव सर्वश्रुत होता. पवार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp