Pune | Mon, 16 February 2026

Ad

अंधेरीत उद्या ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा

Sunil Goyal | 1 views
अंधेरीत उद्या ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा

मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व भवन्स कॉलेज, अंधेरी (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा भवन्स कॉलेज, मुंशी नगर, आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत पार पडणार आहे.

या मेळाव्यात मुंबईतील नामांकित कंपन्या रिक्त पदांसह सहभागी होणार असून, उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्राथमिक निवड त्याच ठिकाणी केली जाणार आहे. तसेच शासनाच्या विविध महामंडळांमार्फत उपलब्ध सवलतीच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण संस्थाही मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासन यांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभही पात्र उमेदवारांना मिळणार आहे.

१० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय तसेच विविध शाखांतील पदवीधर उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp