Pune | Sun, 15 February 2026

Ad

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Sunil Goyal | 9 views
चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३ – राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) दि. 26 एप्रिल 2026 रोजी एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरीता शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी नियमित शुल्कासह 13 फेब्रुवारी, विलंब शुल्कासह 14 ते 20 फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह 21 ते 24 फेब्रुवारी तर अति विशेष विलंब शुल्कासह 25 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

 

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp